दुहेरी हत्याकांड प्रकरणी १५ दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांचे राष्ट्रवादीकडून अभिनंदन…

सावंतवाडी : शहरातील वृद्ध महिलांच्या खुनासह मागील खुन्याचा शोध न लागल्यान पोलीसांवर टीका होत होती. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून त्या वृद्ध महिलांच्या खुन्याचा शोध घेण्याबाबत निवेदन दिल होत. शनिवारी रात्री या खुन्याचा शोध घेण्यात आला. या खुन्याच्या शोधासाठी दिवाळी सणात देखील सलग दोन आठवडे पोलीस खुन्याच्या शोध घेण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होते. कोणत्याही प्रकारचा पुरावा नसल्यान खुन्याच शोध घेण पोलिसांसमोर मोठ आव्हान होत. खुन्याला जेरबंद करणाऱ्या पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांसह पोलीसांच राष्ट्रवादीकडून अभिनंदन करण्यात आल. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, दर्शना बाबर-देसाई, जाहीर ख्वाजा, शफिक खान, नवल साटेलकर, इफ्तिकार राजगुरू, संतोष जोईल, असिफ ख्वाजा, श्री. नाईक आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page