*⚡सावंतवाडी ता.१५-:* शहरातील दुहेरी हत्याकांडाचा योग्य तपास करून आरोपींला जेरबंद केल्याप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे अभिनंदन केले.मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक डॉ नितीन कटेकर व सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट घेतली. दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी विलक्षण चातुर्याने व जबरदस्त शिताफीने आरोपीला जेल बंद केले. अधिकाऱ्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे यातील संशयित आरोपी स्थानिक असल्याने साक्षीदार, पंच यावर दबाव आणु शकतो याची दक्षता घ्यावी तसेच सावंतवाडी शहरात घडलेल्या काही अजून गुन्हे आहेत त्याचा तपास वेगाने व्हावा व आरोपीला लवकरात लवकर गजाआड करा अशी मागणी केली. यावेळी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड राजू कासकर, माजी उपजिल्हाध्यक्ष अॅड अनिल केसरकर, तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ, प्रकाश साटेलकर, मळगाव शाखाध्यक्ष राकेश परब, नेमळे शाखाध्यक्ष बाबुराव राऊळ,व्येते शाखाध्यक्ष महादेव पेडणेकर, निरवडे शाखाध्यक्ष प्रशांत निरवडेकर, सिद्धांत बांदेकर आदी उपस्थित होते
दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीला जेरबंद करणाऱ्या सावंतवाडी पोलिसांचे मनसेने केले अभिनंदन
