महागाईच्या विरोधात काँग्रेस 19 रोजीकणकवली शहरात काढणार पदयात्रा

काँग्रेसची जनजागरण मोहीम व कणकवली कार्यालयाचे होणार उद्घाटन

*⚡कणकवली ता.१५-:* स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १९ नोव्हेंबरला २०२१ रोजी कणकवली तालुक्यात तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाचे प्रभारी विनायक देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे व सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कणकवली तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरीत्या महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार कणकवली शहरात जनजागरण मोहीमे मार्फत पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच यावेळी कणकवली तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस च्या वतीने काँग्रेस सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्व काँग्रेस पदाधिकारी , काँग्रेस कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी यांनी १९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक १०.३० मि. वाजता तालुका काँग्रेस कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप मांजरेकर व शहर काँग्रेस अध्यक्ष महेश तेली यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page