भाजपा किसान मोर्चातर्फे नियुक्ती;बांदा मंडलची जबाबदारी प्रवीण देसाई यांच्याकडे
*⚡सावंतवाडी ता.१५-:* आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने भाजपा किसान मोर्चा आंबोली मंडल अध्यक्षपदी कारिवडे-आंबोली येथील तुकाराम अमुणेकर, तर बांदा मंडल अध्यक्षपदी डेगवे येथील प्रवीण देसाई यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबतचे पत्र भाजपा किसान मोर्चा ज़िल्हाध्यक्ष यांनी अमुणेकर व देसाई यांना दिले आहे.अमोणकर व देसाई यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
