संजय घोगळे यांच्या पचकारम्या या पुस्तकाचे चित्रपट अभिनेते श्री. अभय नेवगी यांच्या हस्ते प्रकाशन

*⚡वेंगुर्ले ता.१५-:* विविध माध्यमातून स्वच्छंद लेखन करणारे लेखक श्री. संजय गोविंद घोगळे यांचे ‘पचकारम्या’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट ‘पिकासो’ मध्ये लक्ष्यवेधी भूमिका करणारे सुप्रसिध्द अभिनेते श्री. अभय नेवगी यांच्या शुभहस्ते दिनांक 14 नोव्हेंबर रोजी झाले. श्री. संजय घोगळे यांचे ‘पचकारम्या’ हे तिसरे पुस्तक असून यापूर्वी त्यांच्या प्रसिध्द झालेल्या ‘आठवणीतला वेंगुर्ला’, ‘स्वप्नातला वेंगुर्ला’ या पुस्तकांना वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. हे पुस्तक पीडीएफ स्वरुपात वितरीत करण्यात येणार असून वाचकांसाठी मोफत असणार आहे. तर याच्या काही निवडक छापील प्रतीही वाचकांना तसेच वाचनालय या सारख्या संस्थांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार असून पुस्तकाच्या मागणीसाठी 8655178247 या क्रमांकावर व्हाटसअप्प व्दारे संपर्क साधावा असे आवाहन श्री. संजय घोगळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page