तळेबाजार येथे बँक ऑफ इंडिया ए टी एम सेवा सुरू करा…

मनसेची शाखाधिकारी यांच्याकडे मागणी

*⚡देवगड ता.१४-:* तळेबाजार बँक ऑफ इंडिया एटीएम सेवा सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत शाखाधिकारी तळेबाजार यांचेकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सुमित तेली, समीर कदम,विशाल मिराशी,प्रतीक मुळम,वैभव मल्हार उपस्थित होते. पत्रात नमूद केल्याप्रमाणे,तालुक्यातील तळेबाजार येथे फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एकच एटीएम असून तेही काही वेळा तांत्रिक कारणांमुळे अनेक वेळा बंद असते. तळेबाजार बाजारपेठ ही, आसपासच्या गावांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे तसेच देवगड तालुका हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा तालुका असल्यामुळे तळेबाजार बाजारपेठेत परराज्य तसेच इतर जिल्ह्यातुन पर्यटकांची वर्दळ असुन त्यात एटीएम वापरणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावातून मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारपेठेमध्ये येत असतात. सर्व बाबींचा तसेच आपल्या बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन आपल्या बँक ऑफ इंडिया तळेबाजार शाखेमार्फत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर एटीएम सुविधा सुरू करून सर्व तळेबाजार मधील नागरिक, आणि बँक ऑफ इंडिया चे खातेदार, बाहेरगावावरून येणारे पर्यटक, व्यापारी व ग्राहक यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने मार्फत करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page