वाचनसंस्कृती वाढवून प्रत्येकाने आपल्या ज्ञानाच्या कक्षा समृद्ध कराव्यात:रामचंद्र आंगणे

*⚡कणकवली ता.१४-:* महाराष्ट्र शासनाने पुस्तकांचे गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिलार गाव निर्माण केल आहे. त्याच धर्तीवर वाडी तिथे वाचनालय निर्माण करून सिंधुदुर्गातील पोखरण गावाने अनोखा उपक्रम भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये वाचनालय सुरू केला आहे. पोखरण गावचे सुपुत्र माजी पोलीस कमिशनर शरद नारायण सावंत यांनी पोखरण गावातील प्रत्येक वाडीला एक कपाट आणि त्या कपाटात राहतील एवढी पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. त्याचा शुभारंभ प्राथमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्गचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या हस्ते करण्यात आला. गावामध्ये आज प्रत्येक वाडीत वाचनालय सुरू करून पोखरण गावाने सिंधुदुर्गात आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श जिल्ह्यातील प्रत्येक गावाने घेऊन वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे वाचनसंस्कृती वाढवून प्रत्येकाने आपल्या ज्ञानाच्या कक्षा समृद्ध कराव्यात. पोखरण सारख्या गावाने जो आदर्श सर्वांसाठी दिलाय तो कौतुकास्पद आहे .पोखरण हे सिंधुदुर्गातील भिलार ठरले आहे.असे गौरवोद्गार उपशिक्षणाधिकारी आंगणे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोखरण सरपंच समीक्षा जाधव या उपस्थित होत्या. त्याचबरोबर पोखरण केंद्राचे केंद्रप्रमुख संजय कदम, ग्रा.पं. सदस्य अरुण सावंत ,सौ.सविता सावंत,सौ संजना सुतार, सौ. रुपाली गावडे याही उपस्थित होत्या त्याचबरोबर पोखरण गावचे सामाजिक कार्यकर्ते एस के सावंत , गावचे कीर्तनकार केदार सावंत, पोखरण शाळा नंबर एक च्या व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. श्वेता सावंत, उपाध्यक्ष पंढरीनाथ सावंत,रवींद्र पांगम,दिलीप सावंत, विनोद कदम,पोखरण शाळा नं.1च्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिक्षा कदम, पोखरण वरचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक विवेकानंद गंगावणे, पोखरण बिबतळे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.साधना सुर्यवंशी याचबरोबर गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. उपशिक्षणाधिकारी आंगणेे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक वाडीला पुस्तकांसह कपाट सुपूर्त करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक शामसुंदर सावंत यांनी केले.तर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यविजय सावंत,रावजी सावंत, माजी सैनिक विठोबा सावंत,तुकाराम सावंत, दिनेश मठकर,रघुनाथ सावंत, महेश पाडगावकर,प्रथमेश सावंत, गोविंद सावंत, पोलीस पाटील सौ. पद्मश्री सावंत, विजय सावंत , तनुजा राणे,सेजल राणे,प्राजक्ता सुतार,सानिका सावंत, निनाद सावंत, कोमल सावंत, सुपर्ण पोखरणकर यांनी विशेष मेहनत घेतली.

शरद सावंत यांच्याकडून कपाट व कपाटात राहतील एवढी पुस्तके भेट

You cannot copy content of this page