निवडणूक आयोगातर्फे मतदार यादी पुनर्नीरीक्षण सुरु

श्रीकांत देशपांडे यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली माहिती

*⚡कुडाळ ता.१४-:* यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी येत्या ५ जानेवारीला प्रसिद्ध होणारी मतदार यादी अंतिम राहणार आहे. त्यापूर्वी १ ते ३० नोव्हेंबर या दरम्यान मतदानाविषयी हरकती, दावे तसेच नवमतदार नोंदणी करणे आवश्यक असून त्यसाठी निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देशपांडे पुढे म्हणाले की, या पुनर्निरीक्षण कार्यक्रमात मतदाराच्यानावातील बदल तसेच इतर दुरुस्ती करावयाची असल्यास १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर यादरम्यान शुद्धीकरण करणे अनिवार्य आहे. आत्ताची एक नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेली यादी ही एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी रद्दबातल होणार आहे. तत्पूर्वी सर्व मतदार तसेच नवमतदार यांनी आपली माहिती निवडणूक विभागाकडे दुरुस्तीसाठी देणे आवश्यक आहे. आता होणाऱ्या या पुनर्निरीक्षण कार्यक्रमात ज्या लोकांची दोन दोन नावे आहेत, असे लोक शोधून त्यांचे एका ठिकाणचे नाव रद्द करण्यात येईल. असे मतदार ४ लाख आहेत. हा कार्यक्रम सध्या सुरू असून मतदानकार्डवर ज्यांचे फोटो नाही आहेत त्यांना फोटो लावून नवीन ओळखपत्र देण्यात येणार आहेत. असे 28 लाख मतदार आहेत तर काही मतदार वर्षानुवर्षे एका ठिकाणी तर त्यांची नोंदणी दुसऱ्या ठिकाणी असते असे लोक शोधून यांची एकाच ठिकाणी नोंदणी करण्यात येणार आहे. अशा लोकांचे शुद्धीकरण १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. तसेच हरकती, दावे नोंदविणे, मयत झालेले मतदारांची यादी काढून टाकणे अशी मोहीम १ डिसेंबर ते २० डिसेंबर या दरम्यान होणार आहे. अंतिम यादी 5 जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नाही. त्यामुळे या यादीत नाव असणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदार व मतदारांनी वोटर्स ॲप चा वापर करावा व त्यात आपली माहिती परिपूर्ण भरावी. ज्या मतदारांची ओळखपत्रे किंवा फोटो खराब झाला असेल तर 001 हा फॉर्म भरून दिल्यास त्या मतदाराला नव्याने ओळख पत्र देण्यात येईल येणार आहे. *१६ रोजी संपूर्ण राज्यात ग्रामसभा होणार* सध्या ग्रामपातळीवर मतदार दुरुस्ती व नवमतदार नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. यासाठी १६ नोव्हेंबर रोजी ग्रामपातळीवर ग्रामसभा आयोजित करून या ग्रामसभेत मतदार नोंदणी विषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच नगरपरिषद किंवा नगरपंचायत मध्ये वार्ड निहाय सभा घेऊन माहिती दिली जाणार आहे. *आता अपंग करणार पोस्टल मतदान* मतदार नोंदणी विषयी २७ व २८ नोव्हेंबर रोजी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. याच दरम्यान जे मतदार अपंग किंवा विकलांग असतील अशा मतदारांची माहिती एकत्रित करून त्यांची नोंद घेण्यात येईल व या अपंगांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर न जाता पोस्टल द्वारे मतदान करता येणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेला जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले असतील त्यांची वोटर हेल्पलाईन चा उपयोग मतदार नोंदणी मतदार नोंदणी धारकांनी केल्यास त्याचा उपयोग सर्व दृष्टीने होईल. या ॲप मध्ये मतदार दुरुस्ती फोटो यांचा समावेश करता येईल आणि थेट मतदार नोंदणी होईल. संपूर्ण राज्यात १६ नोव्हेंबर रोजी खास ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभेमध्ये मतदार नोंदणी विषयी दावे हरकती विषयी माहिती देण्यात येणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक जयकृष्ण फड, कुडाळ प्रांत वंदना खरमाळे, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने , प्रशांत पानवेकर, कुडाळ तहसीलदार अमोल फाटक, वेंगुला तहसीलदार प्रवीण लोकरे देवगड तहसीलदार मारुती कांबळे, दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर, मालवण तहसीलदार अजय पाठने, वैभववाडी तहसीलदार रामदास झळके, कणकवली तहसीलदार प्रिया हर्णे , सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page