देवगड आगारात संप सुरूच

कामावर रुजू न होण्याचा कामगारांचा निर्धार

*⚡देवगड ता.१४-:* रापम महामंडळाच्या देवगड आगारातील सर्व कर्मचारी प्रामुख्याने चालक वाहक,यांत्रिक कर्मचारी ,वहातुक नियंत्रक,लिपिक यांनी गेली सात दिवस सुरू ठेवलेला संप रविवारी देखील सुरू असून या संपातील कामगारांना कामावर रुजू होण्याच्या सूचना आल्याचे कळते परंतु कामगार वर्गाने एकजूट दाखवीत कामावर रुजू न होण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते.दरम्यान वाडातर येथील सामाजिक कार्यकर्ते,सुधीर जोशी यांनी संपस्थळी भेट देऊन कामगार वर्गाशी चर्चा केली .कामगारांची वेतन व अन्य भत्ते,तसेच विलनिकरण मागणी ही रास्त असून एसटी कामगार हा ग्रामीण भागातील जनतेचा सेवक आहे .व ग्रामीण भागाशी त्याची नाळ जोडली असल्याने प्रवासी वर्गाचे हाल होत असले तरी त्यांच्या पाठीशी निश्चित जनता आहे असेही त्यांनी नमूद केले.या वेळी सेवानिवृत्त वहातुक नियंत्रक डी.बी.कोयंडे उपस्थित होते.नांदगाव देवगड मार्गावरील सहा आसनी रिक्षा व्यावसायिकांनी देखील एसटी कामगारांच्या संपाला पाठींबा व्यक्त करून खाऊ भेट दिला.स्थानिक राजकीय पक्षांचे पदाधिकारी,स्थानिक संघटना,मंडळे यांनीही यापूर्वी पाठींबा व्यक्त केला आहे.१५ सलग दिवस महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या आगारामधून बेमुदत संप सुरू ठेवले होते. परंतु तरी देखील शासनाने दखल न घेतल्याने अखेर सर्व आगारात सोमवार पासून बेमुदत संप देवगड गेली ७ दिवस देवगड आगारात सुरू असून या बेमुदत संपाला देवगड मधील विविध संघटना,संस्था ,प्रतिनिधींनी भेट देऊन जाहीर पाठींबा व्यक्त केला.व कामगार वर्गाशी चर्चा करून धीर दिला.सोमवार सकाळ पासून सुरू करण्यात आले आहे.हा संप सलग सातव्या दिवशी अहोरात्र सुरू असून प्रसंगी एसटी कर्मचारी रात्रीच्या वेळी बसस्थानक बाहेरील रस्त्यानजीकच्या मंडपात विश्रांती घेत आहेत. रविवारी सकाळीही सुरू ठेवण्यात आला आहे यापुढेही संप अधिकाधिक मोठ्या संख्येने यशस्वी करीत असताना शांततेच्या मार्गाने हे संप आंदोलन यशस्वी करण्यात येणार आहे . .सर्व कामगार संघटना एकजुटीने या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.कामगार एकजुटीचा विजय असो,राज्य सरकारच्या सवलती मिळाल्या पाहिजेत,राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा या मागण्यांकरिता बेमुदत संप देवगड आगारात पुकारण्यात आला आहे. वहातुक नियंत्रक ,लिपिक,ही चालक वाहकां समवेत सहभागी झाले आहेत.

You cannot copy content of this page