*⚡कणकवली ता.१४-:* वृद्धाश्रमातील वृद्धांना मदतीसाठी दात्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. निराधारांसह वृद्धांची सेवा करणाऱ्या वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. अशा वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी वृद्धाश्रमाला विविध माध्यमातून मदत देण्याबरोबरच सर्वांनी वृद्धांसाठी वेळ देत त्यांच्यासोबत वेळ घालविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन देवगडचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी असलदे येथे केले असलदे येथील स्वस्तीक फाउंडेशनच्या दिवीजा वृद्धश्रमाला निवृत्त देवगड तहसीलदार कै. चंद्रकांत निमणकर यांच्या स्मरणार्थ त्याच्या कुटुंबियांतर्फे जीवनावश्यक वस्तु नुकत्याच देण्यात आल्या. यावेळी श्रीमती सविता निमणकर, सौ. निकीता बगळे – निमणकर, सौ. संजना चिंदरकर – निमणकर, वीरेंद्र चिंदरकर, अमीत हळदणकर, वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका दीपिका रांबाडे, संदेश शेट्ये आदी उपस्थित होते. यावेळी रांबाडे यांनी श्रीमती निमणकर यांचे तुळशीचे रोपटे देऊन कृतज्ञता व्यक्त केली यावेळी रांबाडे म्हणाल्या, वृद्धाश्रमात ३५ हून अधिक वृध्द राहत आहेत. वृद्धाच्या मार्फत त्यांची सेवा केली जाते. मात्र त्यांच्यासाठी दात्यानी पुढे यावे, वृद्धाश्रमाची सध्याची जागा अपुरी असून भविष्यात ही इमारत विस्तारीत करण्याचे नियोजन आहे त्यासाठी दात्यानी आर्थिक व इतरही मदत करावी. यावेळी मैथिली बगळे, अनिकेत बगळे, विधी चिंदरकर आदी उपस्थित होते यावेळी धान्य, साबण, साखर, चहा पावडर, बिस्किट्स आदी वस्तू देण्यात आल्या. यावेळी श्री. बगळे यांनी आश्रमासाठी चिरे देण्याचे आश्वासन दिले.
असलदे दिवीजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू
