पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीने केला सत्कार

*⚡कणकवली ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, पिंगुळी येथील ठाकर लोककलाकार परशुराम गंगावणे यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते परशुराम गंगावणे यांना दिल्ली येथे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्या वतीने पद्मश्री परशुराम मामा यांचा भव्य सत्कार कणकवली तालुक्याच्या वतीने करण्यात आला. त्या वेळी तालुकाध्यक्ष अमित ठाकूर यांनी पद्मश्री परशुराम मामा गंगावणे यांनी ठाकर समाजाचे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आपल्या लोककलेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आणि सातासमुद्रापार करून हा बहुमान समस्त ठाकर समाजालाच मिळवून दिल्याबद्दल मामांचे आभार मानले. पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्यावतीने अध्यक्ष अमित ठाकूर, सचिव समीर ठाकूर, अनंत ठाकूर सच्चिदानंद ठाकूर , विठ्ठल ठाकूर ,मदन ठाकूर, कैलास नेमळेकर, सुजय ठाकूर ,प्रशांत मराठे(कुडाळ), निलेश गंगावणे( वेंगुर्ले) या कार्यक्रमाला उपस्थित होते.

You cannot copy content of this page