भाजपच्या मोहिनी मडगावकर यांचा प्रश्न
*⚡सावंतवाडी ता.१४-:* लोकशाहीत मत मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. भाजप नेते आणि पदाधिकारी आमदार दिपक केसरकर यांच्या चुकीच्या कार्यपद्धती बाबत बोलत आहेत यात चुकीचे काही नाही. जनतेच्या प्रश्नांना लोकप्रतिनिधी हे उत्तरदायित्व असतात.बोलू न देणे, विरोधात बोललात तर फिरू देणार नाही अशी धमकी देवून केसरकर समर्थक नगरसेविका अनारोजिन लोबो यांना सावंतवाडी शहरात हुकूम शाही सुरु करायची आहे का असा प्रश्न भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी उपस्थित केला आहे.आमदार केसरकर यांच्या विरोधात बोललात तर सावंतवाडी शहरात फिरू देणार नाही असा इशारा नगरसेविका लोबो यांनी दिला होतो त्याला यांनी प्रसिद्ध पत्रकातून उत्तर दिले. राजकारणातील पुढारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो त्यांच्या यश अपयश याबद्दल टीका टिप्पणी ही होतंच असतें तो प्रत्येकाचा अधिकार आहे. म्हणून आम्ही बोललो. ते लोबो यांना का झोंबलं.म्हणून तुम्ही फिरू देणार अशी धमकी देत आहात. अशी वेळ तुमच्यावर येणे हे तुमचं आणि तुमच्या नेत्यांचे अपयश आहे. सुसंस्कृत सावंतवाडी तुम्ही अशी विधानेच कशी काय करू शकतात.गेली अनेक वर्षे तुमचीच सत्ता नगरपालिकेत होती. फक्त मोती तलावा भोंवती दिवे लावणे म्हणजे पूर्ण सावंतवाडी चा विकास आहे का? शहरातील ग्रामिण भागाचा विकास कधी लोबो तुम्ही सत्तेत असताना केलात का. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी नुकतीच नगरपालिका येथे भेट देत शहराबरोबरच ग्रामीण भागाचा प्रधान्याने विकास करा, उपाययोजना करा असा आदेश अधिक सुचना नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना दिले आहेत. त्यामुळे विकासासाठी भाजप नेहमीच अग्रही आहे. भाजपच्या नेत्यांनी शहराच्या विकासाबाबत दिलेले शब्द पूर्ण केले जातील. याची काळजी लोबो तुम्ही करू नका. तुम्ही सावंतवाडी च्या जनतेवर पैसे घेऊन मते दिली असा आरोप केला. हा येथील जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे. त्याची अगोदर माफी मागा.नाहीतर याचा जाब तुम्हाला निवडणूकित जनताच विचारेल.अनेक वर्षे सत्ता असून सुद्धा ज्यानं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शहरात बसविता आला नाही त्यांनी त्यांच्या नेत्यांनी विकासाच्या गोष्टी सांगू नयेत. आगामी नगरपालिका निवडणूक आहे हे लक्षात घेऊन आमदार केसरकर सक्रिय झालेत. एवढे दिवस कधी बोलत नहोते पण आता विकास त्यांना दिसत आहेत. सत्ता पुन्हा मिळणे कठीण वाटत असल्याने आमदार नितेश राणे आणि भाजप वर ते टीका करत आहेत. आणि त्याला भाजप ने उत्तर दिले म्हणून लोबो मॅडम खूप दुःखी झाले आहेत. त्यातून त्या सैरभैर होत फिरायला देणार नाही अशी हुकूमशाही विधाने करून सुसंस्कृत आणि शांत सावंतवाडी शहरातील वातावरण बिघडवू पाहत आहेत असे रोखठोक उत्तरे दिले आहे
