शिवप्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळ नेमळे व सिंधूमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
*⚡सावंतवाडी ता.१४-:* शिवप्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळ नेमळे व सिंधूमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा नेमळे कुंभारवाडी येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य एकनाथ चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे, तालुका खजिनदार सिध्दार्थ पराडकर, शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, नेमळे उपसरपंच विक्रम पांगम, शिवप्रतिष्ठान नेमळे उपाध्यक्ष शंकर राऊळ, नितीन पांगम पत्रकार संजय पिळणकर आदी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्यामसुंदर मालवणकर, अरविंद राऊळ, निळू गावडे, समृद्धी पिळणकर, शाळेच्या मुख्य शिक्षिका गोवेकर मॅडम, श्रीकृष्ण राऊळ, लीलाधर राऊळ, साईस्वरूप देसाई, आरोग्यसेवक भिकाजी जाधव, ओरोस रक्तपेढीचे डॉ. बेळणेकर, किशोर नांदगावकर, इतर कर्मचारी व रक्तदाते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबली गवंडे यांनी तर एकनाथ चव्हाण यांनी आभार मानले.
