महागाई विरोधात कॉग्रेसची शहरात जनजागरण अभियान फेरी…

सावंतवाडी देशातील महागाई विरोधात येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज सावंतवाडी शहरात जन जागरण अभियान फेरी काढली यावेळी पदाधिकाऱ्यांकडून कृत्रिम महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील गांधी चौकात काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या जनजागरण फेरी ला सुरुवात करण्यात आली तेरी संपूर्ण शहरात काढण्यात आली. या जनजागरण फेरीमध्ये माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, सावंतवाडी तालुकाप्रमुख महेंद्र सांगेलकर शहर प्रमुख राघवेंद्र नार्वेकर तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी ,सच्चिदानंद बुगडे ,आनंद परुळेकर, अमिदी मेस्त्री, जास्मिन लक्ष्मीश्वर,केतन कुमार गावडे, एम एम सावंत, नागेश मोर्ये, प्रकाश जैतापकर,अमोल सावंत, किरण टेंबुलकर, श्रीकृष्ण तळवडेकर, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बाळा गावडे म्हणाले केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार हे जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे सपुर्ण जिल्ह्यात याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page