अन्यथा आंदोलन करणार;सरपंच शेरपुद्दीन बोबडे यांचा इशारा
वैभववाडी प्रतिनिधी उंबर्डे-फोंडा रस्त्याच्या नुतणीकरणाचे काम तात्काळ सुरू करावे. अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा उंबर्डे सरपंच शेरपुद्दीन बोबडे यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना याबाबत निवेदन दिले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या उंबर्डे-फोंडा या रस्त्याच्या नुतणीकरणाचे काम मंजूर झाले आहे.नुकतेच या कामाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भुमीपुजन झाले होते.यावेळी ठेकेदाराने १०नोव्हेंबरपासून कामाला सुरवात करतो अस आश्वासन दिले होते. मात्र हे काम सुरू न झाल्यामुळे उंबर्डे सरपंच शेरपुद्दीन बोबडे यांनी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता यांनी याबाबत निवेदन दिले आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,उंबर्डे-फोंडा रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे.ठेकेदाराने हे काम नोव्हेंबर पासून सुरु करण्याचे मान्य देखील केले होते. मात्र या कामात राजकारण आले आहे. त्याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे.पक्षीय राजकारणामु सर्वसामान्य जनतेला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.त्यामुळे कोणत्याही राजकारणाला बळी न पडता या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बोबडे यांनी दिला आहे.
