एसटीच्या राज्यव्यापी आंदोलनाला सावंतवाडीत कर्मचाऱ्यांचा पाठिंबा

आ दीपक केसरकर यांनी भेट देत मागण्या घेतल्या जाणून

सावंतवाडी-: शासन सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शवीत सावंतवाडी आगारातील कर्मचाऱ्यांनीही आजपासून काम बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला आहे. दरम्यान, या आंदोलनास आमदार दीपक यांनी भेट देत कामगारांशी चर्चा केली. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवा, अशी मागणी कामगारांनी केसरकर यांच्याकडे केली. दरम्यान, कामगारांच्या आंदोलनामुळे एसटी सेवा खंडित झाली असून त्यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे कामगारांनी सांगितले.

You cannot copy content of this page