मालवण दि प्रतिनिधी तेली समाज उन्नती मंडळ मालवणच्या अध्यक्षपदी राजन वासुदेव आचरेकर यांची तर सचिव पदी मंगेश विठ्ठल शेर्लेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मालवण येथील तेली समाज उन्नती मंडळ मालवण या संस्थची वार्षिक सर्वसाधारण सभा देऊळवाडा मालवण येथील पादुका मंदिरात कोरोना प्रतिबंधक नियम पाळून पार पडली. या बैठकीत सन २०२१ ते २०२४ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळ निवडण्यात आले ती पुढील प्रमाणे. अध्यक्ष राजन वासुदेव आचरेकर, उपाध्यक्ष सदाशिव दत्तात्रय, सचिव मंगेश विठ्ठल शेर्लेकर, सहसचिव उदय राघोबा पाटकर, खजिनदार काशिनाथ बाळकृष्ण पेडणेकर, सदस्य दिनेश राजाराम डिचवलकर, विनायक मधुसूदन आरोलकर, मयुरी मंगेश वेंगुर्लेकर, ब्रह्मदेव विजय तळगावकर, सुनील नारायण आंबेरकर, अंकुश सुरेश नेरुरकर, संतोष यशवंत वायंगणकर, गोविंद नारायण कवटकर, भाग्यश्री भालचंद्र डिचवलकर, श्रमिका शिवराज वाडकर, दशरथ वामन कवटकर, बापू (जयराम) तळवडेकर, अशोक नारायण ओटवणेकर
तेली समाज तालुकाध्यक्षपदी राजन आचरेकर बिनविरोध झाली निवड
