नायब तहसीलदार ए के नाईक यांनी दिला धनादेश
वैभववाडी प्रतिनिधी वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या आचिर्णे धनगरवाडा येथील राजश्री राजाराम शिंगाडे यांच्या कुटुंबाला शासनातर्फे ४ लाखांची आर्थिक मदत दिली. या मदतीचा धनादेश नायब तहसीलदार ए. के. नाईक यांनी त्यांचे पती राजाराम शिंगाडे यांना सुपूर्द केला. राजश्री शिंगाडे ४ ऑक्टोबरला गुरे चारण्यासाठी गेल्या असताना वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पंचनामा, शवविच्छेदन अहवाल या बाबींची पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने पुर्तता केल्याने महसूल विभागाने शासनाला प्रस्ताव पाठविला होता. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती भरपाई अंतर्गत चार लाखांची आर्थिक मदत मंजूर झाली. या मदतीचा धनादेश नायब तहसीलदार नाईक यांनी सुपूर्द केला. यावेळी महसूल कर्मचारी जांभेकर, कांचन मांजरेकर, गायकवाड, संतोष बोडके आदी उपस्थित होते.
