कणकवली नगरपंचायतच्या डीपी प्लॅन ड्रोन सर्व्हेला 8 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार

*⚡कणकवली ता.०७-:* कणकवली नगरपंचायतच्या सुधारित शहर विकास आराखड्याचा ड्रोन सर्व्हे 8 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. गेले चार दिवस पावसाचे वातावरण असल्यामुळे सोमवार 8 नोव्हेंबर पासून 10 नोव्हेंबर पर्यत हा सर्व्हे करण्यात येणार आहे. या ड्रोन सर्व्हे करिता नियुक्त करण्यात आलेल्या टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत हा सर्व्हे सुरू करण्यात येणार आहे. या सर्व्हे करिता पूर्वतयारीसाठी टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची टेक्निकल टीम कणकवलीत दाखल होणार आहे. कणकवली शहरात ड्रोन द्वारे सर्व्हे करण्याकरिता एकूण 47 पॉईंट निश्चित करण्यात आले असून त्या पॉईंटवरून हा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कणकवलीत पूर्व तयारीकरिता कंपनीची टीम दाखल झाल्यानंतर ड्रोन सर्व्हे सुरू करण्यापूर्वी कणकवली पोलिस व नगरपंचायत प्रशासन यांनाही सदर सर्व्हे सुरू करत असल्याची माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता 8 नोव्हेंबर पासून कणकवली नगरपंचायतच्या सुधारित डीपी प्लानचा प्रत्यक्षात ड्रोन सर्वे सुरू होणार आहे.

You cannot copy content of this page