सेना-भाजप नेत्यांना खुश करत टेंडर मिळविले

परशुराम उपरकर : परब ठेकेदाराची दोडामार्गात 60 टक्के कामे अपुरी

*⚡सावंतवाडी ता.०७-:* शासनाकडे टेंडर जाणार म्हणून त्यातल्या एका सत्ताधारी ठेकेदाराने इकडचे आमदार पालकमंत्री असताना ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार बोलणाऱ्याकडे दोन-तीन वेळा फेऱ्या मारणारे हे परब ठेकेदार आहेत शिवसेनेत तर त्यांचा मुलगा भाजपमधून निलेश राणे व नारायण राणे यांची बॅनर बाजी करतो. याच परब ठेकेदारांचे दोडामार्ग तालुक्यात ६० टक्के कामे तर रायगड मध्ये देखील काम अपुरी असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच बोलताना उपरकर म्हणाले पुढे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि जादा दराने हे काम मिळवण्यासाठी या चार ठेकेदारांची धडपड सुरू आहे.तसेच काळ या यादीत टाकण्याचा प्रयत्न करणारे आमदार हेच आता कामे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका देखील उपरकर यांनी यावेळी केली आहे.

You cannot copy content of this page