देवबागच्या पर्यटनात मनोरंजनाचे दालन

ग्रामपंचायत व पी अँड पी समूह प्रा ली चा पुढाकार;उभारण्यात आलेय थिएटर

मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन केंद्रबिंदू असलेल्या देवबाग गावात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या देशी विदेशी पर्यटकां बरोबरच स्थानिकांचे मनोरंजन व्हावे या दृष्टीने पी. अँड पी समूह प्रा. लिमिटेड आणि देवबाग ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उभारलेल्या मत्स्यगंधा समर्थ थिएटर मुळे मनोरंजनाचे नवे दालन निर्माण झाले आहे असे प्रतिपादन युनियन बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक कृष्णकांत सातोसे यांनी देवबाग येथे बोलताना केले. देवबाग येथे मत्स्यगंधा समर्थ थिएटरचे उद्घाटन दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर झाले. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, सरपंच जान्हवी खोबरेकर, कृष्णकांत सातोसे, रामगोपाल यादव, प्रणाली उपरकर, व्यवस्थापक हेमंत कुबल, हेमंत उपरकर तसेच ग्रामपंचायत सदस्य व इतर उपस्थित होते. यावेळी सरपंच जान्हवी खोबरेकर यांनी मत्स्यगंधा समर्थ थिएटर मुळे देवबागच्या सांस्कृतिक ठेव्यात नव्याने भर पडल्याचे सांगितले तर हेमंत कुबल यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page