कृषीकन्येकडून मालवण मधील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

*⚡मालवण ता.०६-:* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कृषीकन्या मिताली सुहास हिंदळेकर हिने मालवण तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांसाठी ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक विकास योजनेच्या अभ्यासाअंतर्गत कार्यशाळा आयोजीत करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मिताली हिने कंपोस्ट खत प्रक्रिया, आंबा कोय, कलमबांधणी, फळापासून आणि दुधापासून प्रकिया केलेले पदार्थ, जैविक बीजप्रक्रिया, भात या प्रमुख पिकावरील आढळणाऱ्या किडी व रोग तसेच श्री पद्धतीने भातलागवड खतांचे व्यवस्थापन, कृषी तंत्रज्ञानाबाबत माहिती, मृदा प्रशिक्षण, शेततलाव, बियाची उगवणक्षमता, निंब अर्क, दशर्पणी अर्क व नैसर्गिक शेतीची माहिती दिली. या उपक्रमासाठी प्राचार्य योगेश जंगले, उपप्राचार्य डॉ. सोनाली पावसकर, प्रा. विवेक खरात, प्रा, संकेत रहाटे, प्रा. सामंत, प्रा. विवेक राणे, प्रा. पाताडे, प्रा. देशपांडे, प्रा. सकपाळ, प्रा. गोपाळ गायकी यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page