पेंडूर सातवायंगणी येथे १३ व १४ नोव्हेंबर रोजी दीपावली शो टाईम स्पर्धा

ॐकार युवक कला क्रीडा मंडळाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन

*⚡वेंगुर्ले ता.०६-:* वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर सातवायंगणी येथील ॐकार युवक कला क्रीडा मंडळाच्यावतीने सातवायंगणी येथील श्रीदेव ब्राह्मण स्थळा नजीक शनिवार १३ व रविवार १४ नोव्हेंबर रोजी दीपावली शो टाईम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता सातवायंगणी मर्यादित महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रथम ७०० रुपये, द्वितीय ५०० रुपये व तृतीय ३०० रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. रविवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता लहान व मोठ्या गटात सातवायंगणी नेवाळेवाडी मर्यादित रांगोळी स्पर्धा होणार आहे. लहान गट (१२ वर्षांखालील)-प्रथम क्रमांक ३०१ रुपये, द्वितीय क्रमांक २५१ रुपये, तृतीय क्रमांक २०१ रुपये तर मोठा गट प्रथम ३५१ रुपये, द्वितीय ३०१ रुपये, तृतीय २५१ रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. खुली स्लो मोटार सायकल स्पर्धा-प्रथम क्रमांक ५०० रुपये, द्वितीय क्रमांक ३०० रुपये, स्लो सायकल स्पर्धा सात वायंगणी नेवाळेवाडी मर्यादित प्रथम क्रमांक २५१ रुपये, द्वितीय क्रमांक २०१ रुपये यानंतर लहान व मोठ्या गटात जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. लहान गट (१२ वर्षांखालील) प्रथम क्रमांक २००० रुपये, द्वितीय क्रमांक १५०० रुपये, तृतीय क्रमांक १००० रूपये व उत्तेजनार्थ २५० रुपये, मोठा गट प्रथम क्रमांक २५०० रुपये, द्वितीय क्रमांक २००० रुपये, तृतीय क्रमांक १५०० रुपये तर उत्तेजनार्थ ५०० रुपये, सात वायंगणी नेवाळेवाडी मर्यादित रेकॉर्ड डान्स स्पर्धा प्रथम क्रमांक ७०० रुपये, द्वितीय ५०० रुपये, तृतीय क्रमांक ३०० रुपये, सातवायंगणी नेवाळेवाडी मर्यादित लहान गट रेकॉर्ड डान्स स्पर्धा प्रथम क्रमांक ५०० रुपये, द्वितीय क्रमांक ३०० रुपये, तृतीय क्रमांक २००रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. १४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता उदघाटन सोहळाही होणार आहे. दीपावली शो टाईम स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी मनोज- ९५४५४५७९२४, रोहन-८००७७८४३७, शुभम-९९२१६४२०६६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ॐकार युवक कला क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page