आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती…
सावंतवाडी : दिवाळीनिमित्त ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत सावंतवाडी-पुणे जादा एसटी गाड्या सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी दिली. यात सायंकाळी ६.४५ वाजता सावंतवाडी – पुणे निगडी आंबोलीमार्गे (वातानुकूलित), सायंकाळी ६ वाजता सावंतवाडी – पुणे निगडी आंबोलीमार्गे, सायंकाळी ७.३० वाजता सावंतवाडी – पुणे निगडी आंबोली वाकड हिंजवडीमार्गे, रात्री ८.३० वाजता पणजी – पुणे निगडी फोंडामार्गे, रात्री ८ वाजता पणजी – पुणे निगडी आंबोलीमार्गे (वातानुकूलित), सायंकाळी ७ वाजता सोलापूर – पणजी फोंडामार्गे अशा बस सोडण्यात आल्याचे पडोळे यांनी सांगितले.
