*⚡ओरोस ता.०३-:* अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्या सर्व तालुका कार्यकारणी व विस्तृत जिल्हा कार्यकारिणी यांची विस्तारित कार्यकारिणी घेऊन राज्य निवड समितीचे अध्यक्षतेखाली 2021 ते 2023 साठी जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष पदी राजा कवीटकर, सरचिटणीस पदी बाबाजी झेंडे, कार्याध्यक्ष पदी मधुसूदन घोडे, कोषाध्यक्ष पदी पूनम पालव व महिला प्रमुख पदी श्रावणी सावंत यांची निवड करण्यात आली. संघटनेसाठी सर्व सामान्य कार्यकर्ता पर्यंत आपुलकीने व तळमळीने काम करणाऱ्या सर्व सभासदांचा विचार करण्यात आला. त्यांच्या सर्व कामांचा विचार करून जिल्हा कार्यकारिणी तील सर्व नूतन सभासदांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवड समितीमध्ये राज्य सल्लागार प्रकाश भाई दळवी, राज्य कोषाध्यक्ष श्रीमती विनयश्री पेडणेकर ,राज्य संयुक्त चिटणीस म .ल .देसाई, राज्य संघटक प्रशांत पारकर व जिल्हा संघटक झिलू गोसावी यांनी काम पाहिले .निवड करण्यात आलेली कार्यकारिणी – जिल्हाध्यक्ष राजा कविटकर, जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे ,कार्याध्यक्ष मधुसूदन घोडे, कोषाध्यक्ष सौ पूनम पालव, महिला विभाग प्रमुख सौ श्रावणी सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्ष म्हणून झिलू गोसावी, दत्तात्रय सावंत, सुभाष सावंत, पांडुरंग मोर्ये, सुभाषचंद्र नाटेकर, लक्ष्मण वळवी, संतोष मराठे, भास्कर गावडे, राजेंद्र पाटील, सत्यनारायण साळुंके, संतोष गवस, रविंद्र देसाई, सौ अरुणा घाटकर, उपसरचिटणीस भिवा सावंत, सौ प्रतीक्षा तावडे, संयुक्त चिटणीस श्रीकृष्ण बागवे, कृष्णा सावंत, रवींद्र जाधव, प्रकाश तेंडोलकर, मनोहर गवस, सौ सायली देसाई, सौ सुप्रिया सनये, संतोष रावण, सौ शालन नार्वेकर, सौ राजश्री शेळके, दिव्यांग प्रतिनिधी सौ मोहिनी वस्त, हिशेब तपासनीस दिगंबर तळणकर, सौ स्वप्नाली सावंत, केंद्रप्रमुख विभाग प्रमुख आनंद राजम, मुख्याध्यापक विभाग प्रमुख सौ शर्वरी सावंत, पदवीधर विभाग प्रमुख राजेश भिरवंडेकर, शिक्षक सहायक प्रमुख पुरुषोत्तम शेणई, सेवानिवृत्त विभाग प्रमुख अरुण म्हाडगुत, चंद्रकांत तेली, जिल्हा संघटक रवींद्रनाथ गोसावी सौ प्राची ढवळ, अशोक साळुंखे, तुषार पवार, ज्ञानेश्वर सावंत, सौ सुकन्या मुंडले, सूर्यकांत निर्मळ, सौ मनीषा सावंत, पुंडलिक गवस, दत्तात्रय माईणकर, तुकाराम कसालकर, चेतन बोडेकर, सहदेव गाडी, नितीन सावंत, सौ सीमा पंडित, सौ राधिका परब, सौ स्मिता गवस तर के टी चव्हाण, गुरुदास कुबल, विजय केळकर यांची सल्लागार प्रवक्ता पदी निवड करण्यात आली, उपस्थित निवड समिती अध्यक्ष यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. नूतन जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून जिल्हा संघटनेची सूत्रे हाती घेतली, उपस्थित सर्व जिल्हा कार्यकारणी यांना सांघिक भावनेने काम करण्याचे आश्वासन दिले. शेवटी माजी सरचिटणीस गुरुदास कुबल यांनी सर्वांचे आभार मानले.
जिल्हाध्यक्ष पदी राजा कविटकर तर सरचिटणीसपदी बाबाजी झेंडे, कार्याध्यक्षपदी मधुसुदन घोडे, कोषाध्यक्षपदी पूनम पालव तर महिला प्रमुख श्रावणी सावंत
