*जीतकुने दो राष्ट्रीय स्पर्धेत वरेरी येथील दीक्षा ,जान्हवी चे प्राविण्य

*⚡देवगड ता.०२-:* राजस्थान जयपुर येथे झालेल्या राष्ट्रीय जीत कुने दो स्पर्धेमध्ये सिंधुदूर्गातील देवगडच्या १७ वर्षाखालील गट मुलींमध्ये प्रथम क्रमांक दिक्षा पारकर( वरेरी ), १९ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक जान्हवी ब्राके ( वरेरी ) ,यांनी प्रथम क्रमांकाचे यश संपादित केले आहे.या व्यतिरिक्त १९ वर्षाखालील प्रथम क्रमांक नुरेमुनी अन्सारी (वाडा ) ,१९ वर्षाखालील मुले गटात तृतीय क्रमांक दर्शन धुरी ( दाभोळे ) यानी यश संपादन केले . या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातुन १३० खेळाडू सहभागी झाले होते . तर झारखंड , आसाम , राजस्थान , दिल्ली ,यु.पी अश्या अनेक राज्यातुन ३५० खेळाडुंचा सहभाग होता . महाराष्ट्राचे जीत कुने दो असो . चे अध्यक्ष राज खतिफ साहेब व सचिव अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील खेळांडुनी चांगली कामगिरी केली. सिंधुदूर्गातील खेळाडुंना प्रशिक्षिका व जीत कुदे दो असो सिंधुदूर्ग सचिव शेवंता नाईक यांचे मार्गदर्शन लाभले . या सिंधुदूर्ग टीमला तायक्वॉदो असो.चे अध्यक्ष विवेक नलावडे , दिक्षिता राऊत , यामिनी नारकर , अंकिता जाधव , सर्व पालक वर्ग यांचे सहकार्य लाभले .

You cannot copy content of this page