दीपावली शो टाईमचे आयोजन

वक्रतुंड मित्र मंडळाचा पुढाकार;’होम मिनिस्टर व आयडॉल २०२१ दोडामार्ग’ हे होणार कार्यक्रम

*दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग शहर बाजारपेठेतील वक्रतुंड मित्रमंडळाच्या ‘दीपावली शो टाईम २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘होम मिनिस्टर दोडामार्ग’ व ‘दोडामार्ग आयडॉल २०२१’ हे यावर्षीच्या दीपावली शो टाईमचा खास आकर्षण रहाणार आहेत. दरवर्षी दोडामार्ग शहर बाजारपेठतील वक्रतुंड मित्रमंडळ मोठ्या दिमाखात गेली १२ वर्षे ‘दीपावली शो टाईम’ साजरा करत आहे. मात्र कोरोना काळात थांबलेला हा प्रवास या दिवाळीला पुन्हा एकदा सुरू झाला आहे. येत्या १३ नोव्हेंबरला दोडामार्ग शहरातील खास महिलांचे आकर्षण असलेल्या ‘होम मिनिस्टर दोडामार्ग’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिंकणार्‍या स्पर्धक महिलांना अनुक्रमे ओव्हन व पैठणी, गॅस शेगडी व साडी, कुकर व साडी व सहभागी स्पर्धकांना खास गिफ्ट मिळाणार आहेत. ‘दीपावली शो टाईम २०२१’ मधील युवाईचे खास आकर्षण असलेली ‘दोडामार्ग आयडॉल २०२१’ ही स्पर्धा याच दिवशी संपन्न होणार आहेत. या स्पर्धेत विजेत्यांसाठी अनुक्रमे ७०००, ५०००, ३००० व २००० आणि सर्वांना चषक तर तीन उत्तेजनार्थ साठी प्रत्येकी ५०० व चषक अशी बक्षिसे मिळणार आहेत. या स्पर्धा सहभागसाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मनोज पार्सेकर ९०६७५१९१९२, विशाल चव्हाण ८६०००६५६२०, रजत प्रसादी ९५६१९३९०८२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वक्रतुंड मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page