*⚡मालवण ता.०१-:* मुंबई राजभवन क्लब यांच्या वतीने राजभवन संकुल येथे आयोजित रांगोळी स्पर्धेत मालवण तालुक्यातील आंगणेवाडीची सुकन्या प्राची प्रदीप आंगणे हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. कु. प्राची प्रदीप आंगणे हिचा राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते तिला प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देण्यात आली. प्राची हिने मिळविलेल्या यशा बद्दल आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
आंगणेवाडीच्या सुकन्येचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
