चौकुळ जांभरे रस्त्याचे काम मार्च पूर्वी करा-:मोहन चव्हाण

पंचायत समिती सभा, रस्त्याचे काम योग्य पद्धतीने आणि वेळेत होत नसेल तर उपयोग काय व्यक्त केली खंत…

*⚡सावंतवाडी ता.०१-:* मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या चौकुळ जांभरे या पाच किलोमीटरच्या रस्त्याचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे झाले नसल्याचा आरोप सदस्य मोहन चव्हाण यांनी केला. ज्या पद्धतीने काम होणे आवश्यक होते तसे झाले नसून येत्या मार्च पूर्वी हे काम पूर्ण करा, आम्ही सदर रस्त्यासाठी वनविभागाशी झगडलो आहोत,कार्यालयावर मोर्चे काढले आहेत त्यामुळे रस्त्याचे काम योग्य पद्धतीने आणि वेळेत होत नसेल तर उपयोग काय अशी खंतही त्यांनी उपस्थित केली. सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक आज सभापती सौ निकिता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी व्यासपीठावर उपसभापती शितल राऊळ, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page