खा.राऊत यांनी विनाकारण लोकांची माथी भडकवू नये:राजन तेली

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नवाब मालिक यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपातर्फे निषेध

*⚡कणकवली ता.०१-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे त्यांच्या जावयाला अटक केल्याच्या दुःखातुन अद्यापही बाहेर आलेले नाहीत,त्यामुळेच मागील ५ वर्षे मुख्यमंत्री असताना एकही आरोप ज्यांच्यावर झाला नाही नाही त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याबद्दल आम्ही नवाब मलिक यांचा निषेध करतो. असे सांगतानाचफडणवीस सरकारने बदलीचे अधिकार हे अधिकाऱ्यांना दिले होते,मात्र या महाविकास आघाडी सरकारने हे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत.यामागे भ्रष्टाचार करणे हाच हेतू आहे .कुडाळ येथे ना.राणेंनी केलेलं वक्तव्य हे कुटुंबप्रमुख या नात्यानेच आहे,त्याचा विपर्यास खा.विनायक राऊत यांनी करत बंदोबस्त देण्याची भाषा केली.खा. विनायक राऊत हे विनाकारण लोकांची माथी भडकविण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला. कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेलीबोलत होते. राजन तेली म्हणाले,सी.वर्ल्ड प्रकल्पाला पुन्हा विरोध असल्याचे राऊत यांनी जाहीर करत विकासाच्या आड शिवसेना येत आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे.जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी टाळंबा प्रकल्पाचे २२४ कोटी खर्च होऊनही काम नाही.त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.त्यांनी केवळ टाळंबा प्रकल्पाची नको तर तिलारी व सर्वच पाटबंधारे प्रकल्पाची निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी करावी.आता अनेक वर्षे झाली, प्रकल्पांच्या किमती वाढल्या आहेत,२०२१ साल आले तरी अनेक प्रकल्पांची कामे अपूर्ण आहेत.दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करा,अशी मागणी राजन तेली यांनी करतानाच भाजप विकासाला साथ देईल असे ते म्हणाले. भाजपा कडून विकासाला कुठल्याही प्रकारची अडचण करणार नाही.सी वर्ल्ड बाबतीत खा.राऊत हे प्रकल्प होऊ देणार नाही असे सांगत आहेत.जागा राणेंनी असल्याची टीका करतात.मग सरकार तुमचे आहे,राणेंची जागा असल्यास चौकशी करा.ज्या प्रकल्पामुळे संपूर्ण कोकणचा विकास झाला असता,त्यात विनाकारण लोकांची माथी भडकाव्याची काम शिवसेना खा.राऊत करत असल्याची टीका राजन तेली यांनी केली. येथील तरुण- तरुणी या गोष्टीला माफ करणार नाहीत.भाजपच्या कार्यकर्त्याची तुम्ही काळजी करू नका.नारायण राणे यांच्या विधानाचा विपर्यास केला जात आहे.मुळात कुटुंबप्रमुख या नात्याने राणे याचे विधान आहे.विकास होऊ शकला नाही म्हणून खासदार चुकीचे आरोप करताहेत.शासकीय मेडिकल कॉलेज प्रस्ताव चुकीचे पाठवले जात आहेत, अटींची पूर्तता न करता राजकिय आरोप केले जात आहेत.भाजपचा मेडिकल कॉलेजला विरोध नाही,केंद्राचा दबाव नाही.असेल तर राज्य सरकारने जाहीर करावे.विकासाला खीळ बसेल असे भाजप करत नाही.सर्व प्रकल्पांना आमची सरकारला साथ आहे.खासदारांनी लोकांची दिशाभूल करु नये,असा टोला राजन तेली यानी लगावला.

You cannot copy content of this page