मात्र सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न सुटेना
*⚡कणकवली ता.०१-:* मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा येथील ब्रिज वरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे मात्र सर्व्हिस रस्ता प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याने सर्व एस टी बसेस किंवा इतर वाहने पुलावरून जात आहे. यामुळे नांदगाव तिठा येथे उतरणा-या प्रवासी वर्गाला नांदगाव हायवे लगत असलेल्या कोळंबा मंदिर समोर उतरावे लागते आहे . तसेच नांदगाव तिठा येथून देवगड निपाणी मार्ग असल्याने येथे जाण्यासाठी वाहतूक विरुद्ध दिशेने जावी लागत आहे . नांदगाव वासियांच्या आंदोलन नंतर पुन्हा एकदा हायवे कंपनीने गटार योजनेचे काम सुरू केले आहे तर छोटी छोटी कामे केली जात आहे.मात्र नांदगाव येथील दोन्ही पुलाजवळील सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाल्याने पुलावरून वाहतूक सुरू झाली मात्र सव्र्हिस रस्ता प्रश्न सुटणार कधी ? यामुळे नांदगाव तिठा येथून जाणा-या व येणाऱ्या देवगड वगळता बसेस येत नसल्याने नांदगाव दशक्रोशीतील नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
