दुहेरी हत्याकांड आरोपींना तात्काळ अटक करा

मनसेचे पोलिसांना निवेदन

*⚡सावंतवाडी ता.०१-:* शहरात काल घडलेला प्रकार दुर्दैवी असून, लवकरात लवकर दुहेरी हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी आज मनसे तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे यांनी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी यापूर्वी देखील झालेल्या खुनाचा तपास जलद गतीने करून त्याही आरोपीला अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या सर्व तपास कार्यात पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये असे देखील त्यांना सांगितले आहे. यावेळी मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष अँड राजू कासकर, माजी उपजिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ, मळगाव शाखा अध्यक्ष राकेश परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page