वैद्यकीय आघाडीचे डाॅ.अमेय देसाई यांचा राजन तेली यांच्या हस्ते सत्कार

*⚡कणकवली ता.०१-:* भाजपा वैद्यकिय आघाडी प्रदेश सहसंयोजक डाॅ अमेय देसाई यांनी भाजपा जिल्हा कार्यालयात भेट दिली असता भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी डाॅ. अमेय देसाई यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना जिल्ह्यातील आरोग्य सेवेमधील अडचणी सांगीतल्या व भविष्यात वैद्यकीय आघाडी मार्फत सदर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले . तसेच संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्हात आरोग्यदुत ही संकल्पना राबवून सर्वसामान्य जनता व वैद्यकीय आघाडी यातील समन्वयकाचे काम करणार असल्याचे सांगितले . तसेच उपजिल्हा रुग्णालयात असणारी वैद्यकीय अधिकारी यांची कमतरता दुर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले . यावेळी डाॅ. अमेय देसाई यांच्यांच्या सोबत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे जनसंपर्क अधिकारी अनिल म्हात्रे तसेच प्रदेश का.का.शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई उपस्थित होते . या सत्कार समारंभाला महिला मोर्चा च्या प्रदेश का.का.सदस्य प्रज्ञा ढवण , प्रदेश का का सदस्य व माजी सभापती सुरेश सावंत , कणकवली शहर मंडलाचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री , कणकवली ग्रामीण चे मंडल अध्यक्ष संतोष कानडे बुवा , कणकवली शहर अध्यक्ष अण्णा कोदे , युवा मोर्चा चे पप्पु पुजारे , महिला मोर्चा च्या प्राची कर्पे – संजना सदडेकर , सदा चव्हाण , प्रदीप ठवण तसेच कार्यालयीन मंत्री समर्थ राणे व अजय घाडीगांवकर उपस्थित होते .

You cannot copy content of this page