युवासेनेचे वाढत्या महागाईबाबत केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन…

सांवतवाडी-:देशात दरदिवशी वाढत असलेल्या महागाई विषयी केंद्र सरकारच्या विरोधात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने आज दिनांक ३१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात युवासेना, शिवसेना, तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेना तालुका प्रमुख योगेश नाईक, विनायक सावंत, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर, नगरसेविका अनारोजिन लोबो, माधुरी वाडकर, भारती मोरे, दिपाली सावंत, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आदी उपस्थित होते. यांनी केले आहे.

You cannot copy content of this page