सुधारित अधिसूचनेमधील बदल आरोग्य कर्मचार्‍यांवर अन्यायकारक

आम.वैभव नाईक यांना निवेदन;प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार

कणकवली 31 ऑक्टोबर (प्रत सुधारित अधिसूचनेमधील बदल आरोग्य कर्मचार्‍यांवर अन्यायकारक त्यामुळे याबाबत शासन स्तरावर सदर अधिसूचनेत बदल करावे व ही जाचक अट बदलण्यात यावी अशी मागणी राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटना जिल्हा शाखा सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष यशवंत आरोसकर, के.ए.ठाकूर, प्रशांत बुचडे यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे लवकरच बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा कडुन आरोग्य सेवेतील ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातुन आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या आरोग्य कर्मचारी या पदाचे सेवाप्रवेश नियम २९ सप्टेंबर २०२१ च्या अधिसुचनेव्दारे बदलणेत आलेले आहेत. त्यामध्ये पदनियुक्ती साठी शैक्षणिक पात्रता व पदोन्नतीच्या शैक्षणिक पात्रतेत अमुलाग्र बदल केलेला आहे. कालानुरूप व बदलत्या आरोग्य विषयक समस्या लक्षात घेता आरोग्य कर्मचारी या पदाची शैक्षणिक पात्रता वाढविणे आवश्यक आहे. याबाबत संघटनेस कोणताही आक्षेप नाही. सुधारीत अधिसुचनेपुर्वी आरोग्य कर्मचारी या पदाची शैक्षणिक पात्रता दहावी पास अशी असुन आरोग्य कर्मचारी पदामधुन आरोग्य सहाय्यक पदी १०० टक्के पदोन्नतीची संधी उपलब्ध होती व आरोग्य सहाय्यका मधुन आरोग्य पर्यवेक्षक पदी सेवाजेष्ठते नुसार पदोन्नती देण्यात येत होती.२९ सप्टेंबर २०२१ च्या सुधारीत अधिसुचनेत खालील अन्यायकारक बदल करणेत आलेले आहेत. आरोग्य कर्मचारी या पदाची शैक्षणिक अर्हता दहावी उत्तीर्ण वरुन विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण अशी करणेत आलेली आहे. परंतु आरोग्य कर्मचारी या पदामधुन सेवाजेष्ठतेनुसार आरोग्य सहाय्यक पदी पदोन्नतीसाठी मात्र विज्ञान शाखा पदवीधर असणे आवश्यक आहे अशी जाचक अट घालणेत आलेली आहे. या निवेदनात म्हटले आहे, सुधारीत अधिसुचने पूर्वीचे कार्यरत कर्मचारी हे जुन्या सेवाप्रवेश नियमानुसारच दहावी उत्तीर्ण या शैक्षणिक अर्हतेवरच नियुक्त झालेले आहेत. त्यामुळे अधिसुचने पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी विज्ञान शाखा पदवीधर ही शैक्षणिक अर्हता लागू करून ग्रामीण भागात दारोदारी जावून प्रत्यक्ष आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासुन वंचित ठेवणेचा शासनाचा मानस आहे अशी संघटनेची धारणा आहे. आरोग्य सहाय्यक या सवंर्गातुन सेवाजेष्ठतेनुसार आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी विज्ञान शाखा पदवीधर असणे बंधनकारक केलेले आहे. मुळ नियुक्ती आरोग्य कर्मचारी पदाची शैक्षणिक अर्हता दहावी पास असेल त्या पदाच्या पदोन्नती सवंर्गासाठी विज्ञान शाखा पदवीधर शैक्षणिक अर्हता निश्चित करणे हे निश्चितच अन्यायकारक आहे. नियमित कर्मचाऱ्यामधुन पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होत असताना सुध्दा सरळसेवा भरतीने २ ते ३ हजार कर्मचारी पदोन्नतीपासुन वंचित रहाणार आहेत. सदरच्या सुधारीत अधिसुचनेची अमंलबजावणी झाल्यास सध्या कार्यरत २ ९ सप्टेंबर २०२१ पूर्वीच्या सर्व स्तरावरील राज्यभरातील हिवताप विभागातील हजारो कर्मचारी नियमित पदोन्नती पासुन तसेच शासनाच्या इतर सेवाविषयक लाभापासुन वंचित रहाणार आहेत. या अधिसूचने मुळे एकाही कार्यरत कर्मचाऱ्याला पदोन्नतीची संधी उपलब्ध होणार नाही. २ ९ सप्टेंबर २०२१ अधिसुचनेचे कारण पुढे करून सन २०१ ९ पासून सुरु झालेली नियमित पदोन्नतीची प्रक्रीया थांबविणेत आलेली आहे. मात्र राज्यस्तरीय प्रशासकिय विभागाकडुन जुन्या अधिसुचने नुसार दहावी उत्तीर्ण शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवाराची आरोग्य कर्मचारी या पदावर नियुक्त करणेत येत आहेत. प्रशासनाच्या अशा कारभारामुळे कर्मचाऱ्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.२ ९ सप्टेंबर २०२१ रोजीचे निर्गमित सुधारीत सेवाप्रवेश अधिसुचना तात्काळ रदद् करण्याच्या व जुन्या नियमाप्रमाणे पदोन्नती व इतर लाभ मिळावेत या करीता आपल्या स्तरावरुन संबंधित प्रशासकिय यंत्रणेला आवश्यक त्या सुचना देण्यात याव्यात आणि आम्हा कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष यशवंत आरोसकर, के.ए.ठाकूर, प्रशांत बुचडे यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तसेच या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना देखील देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page