*⚡मालवण ता.२२-:* पळसंब तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी उल्हास सावंत याची तर उपाध्यक्ष पदी महेश वरक याची निवड झाली.ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांच्या अध्यक्षतेच्या खाली पळसंब ग्रामपंचायत येथे सपन्न झाली. यावेळी तंटामुक्त समितीमध्ये बदल करत नवीन सभासदांना स्थान देण्यात आले.यात समिती अध्यक्ष म्हणून उल्हास अनंत सावंत उपाध्यक्ष .महेश वरक यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून प्रमोद सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष .सुभाष तर्फे,सुरेश लाड,श्रीम.वंदना चिंचवलकर, पोलीस पाटील.सीताराम सकपाळ यांची निवड करण्यात आली त्यावेळी ग्रामसेवक काबंळी, उपसरपंच सुहास सावंत, सदस्य एकनाथ चिंचवलकर, अरुण माने, उज्वला परब, सिमा चव्हाण, रोशन चिचंलकर, राजन पुजारे हे उपस्थित होते.
पळसंब तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी उल्हास सावंत यांची तर उपाध्यक्षपदी महेश वरक यांची निवड
