जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांचे आदेश
सिधुदूगनगरी 22-मिशन युवा संस्था अंतर्गत जि.प.आरोग्य विभागाने 104 महाविद्यालय स्तरावर लसीकरणाचे आदेश.*दिले आहेत तरी जिल्हातील 18वषावरील तरूणांना 25ऑकटोबर ते2नवहेबर या कालावधीत आयोजन केले तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जि प अध्यक्षा संजना सावंत,आरोग्य सभापती अनिशा दळवी यानी केले आहे. मिशन युवा स्वास्थ कोवीड-19 लसीकरण अंतर्गत दिनांक 25 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत 18 वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महाविद्यालय स्तरावर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. सदर मोहिमेअंतर्गत 18 वर्षावरील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. लसीकरणात पात्र लाभार्थ्यांची यादी शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षण विभागाने संबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे सोपवण्यात आले आहेत यात वैभववाडी 7,कणकवली14,देवगड 14,मालवण11,कुडाळ 21,वेगुले 7,सावंतवाडी 20,दोडामार्ग9,अशा104महाविद्यालय समवेश आहेत. आरोग्य विभागाने लसीकरण सत्रा साठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील जिल्हा आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. तरी सर्व 18 वर्षावरील विद्यार्थ्यांनी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन यांनी केले आहे.
