वरची देवली येथील तरुण बेपत्ता

*⚡मालवण ता.२१-:* मालवण तालुक्यातील वरची देवली येथील सिद्धार्थ विष्णू चव्हाण (वय ३१) हा तरुण बुधवार दि. २० ऑक्टोबर पासून बेपत्ता आहे. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी गुरुवारी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरची देवली येथील सिद्धार्थ हा पत्नी व छोट्या मुलासोबत येथे राहतो. बुधवारी दुपारी सिद्धार्थ हा युनिकॉन मोटारसायकल (एमएच ०७ एएल ००२६) घेऊन बाहेर निघाला. मात्र तो पुन्हा घरी परतला नाही. त्याचा फोनही काही वेळा रिंग व बहुतांश वेळा स्विच ऑफ येत आहे. सिद्धार्थ याच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने नातेवाईकानी मालवण पोलीस ठाण्यात सिद्धार्थ हा बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. दरम्यान, मालवण पोलिसांनी वरिष्ठ स्तरावरून सिद्धार्थ याच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता गुरुवारी सकाळी चिपळूण येथे मोबाईल लोकेशन दाखविण्यात आले. त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ असल्याने लोकेशन मिळत नव्हते. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डी. जानकर करत आहेत.

You cannot copy content of this page