इळये आणि दाभोळे पाटथर येथील दुर्दैवी घटना
*⚡देवगड ता.२१-:* माडावर चढत व उतरत असताना दोन दुर्घटनेत दोन व्यक्तींचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना देवगड तालुक्यात गुरुवारी सकाळी घडली.या बाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार माडाच्या झाडावर नारळ काढण्याकरिता चढून ते खाली उतरत असताना चंद्रकांत भगवान सावंत वय (५० )यांचा हात सुटून ते खाली जमिनीवर पडले व त्यात त्यांच्या मानेला हाताला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन झाला. अधिक उपचाराकरीता देवगड ग्रामीण रुग्णालयात त्यांना औषध उपचाराकरता नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मयत झाल्याचे सांगितले. सदरची घटना गुरुवारी सकाळी ११.३० च्या मानाने घडली. या घटनेसंदर्भात सुहासिनी गणपत कदम वय ४५ रा. इळये पाटथर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अन्य दुसऱ्या एका घटनेत दाभोळे तेलिवाडी येथील सुधाकर राजाराम निरोमकर वय (५४) हे दाभोळे पाटथर गवळदेव नजीकच्या बागेत सकाळी ९.३०च्या सुमारास नारळ काढण्या करता माडावर चढत असता हात सुटून झाडावरून जमिनीवर खाली पडले व त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.अधिक उपचाराकरता त्यांना रुग्णालयात दाखल केले असता ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेसंदर्भात बाळकृष्ण नारायण निरोमकर (५४) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार उदय शिरगावकर करीत आहेत.
