कणकवली नगरपंचायत विषय समिती सभापती बिनविरोध

ॲड.विराज भोसले, संजय कामतेकर, उर्वी जाधव यांना मिळाली संधी

*⚡कणकवली ता.२१-:* कणकवली नगरपंचायतच्या विषय समिती सभापतीपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. यात बांधकाम सभापती पदासाठी ॲड.विराज भोसले, आरोग्य सभापतीपदी संजय कामतेकर, महिला बालकल्याण सभापतीपदी उर्वी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. कणकवली नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची अधिकृत घोषणा प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केली. ऑनलाईन झालेल्या या विशेष सभेत पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी काम पाहिले. नूतन सभापतींचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी बांधकाम सभापती मेघा गांगण, माजी आरोग्य सभापती अभि मुसळे, माजी महिला बालकल्याण सभापती वृषाली सावंत, नगरसेवक बाबू गायकवाड, शिशिर परुळेकर, मेघा सावंत, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, अण्णा कोदे, सुशील पारकर, बंडू गांगण आदी उपस्थित होते. कणकवली नगरपंचायतमध्ये भाजपाचे स्पष्ट बहुमत आहे त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे निश्चित होते.विरोधकानी या निवडणूकीत उमेदवार उभे केले नसल्याने निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.

You cannot copy content of this page