*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवार दिनांक २२ ऑक्टोबर, २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे सकाळी १०.०० ते दुपारी १.३० या दरम्यान भाजीपाला उत्पादन व परसबाग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत यांनी दिली. शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातून घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गाला सांगूळवाडी, ता. वैभववाडी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. फुटणकर, कणकवली तालुका गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, कणकवली तालुका कार्यालय कृषी सहायक सागर चव्हाण, श्री. पाटील खारेपाटण ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी खारेपाटण येथील सर्व शेतकरी महिला भगिनींनी या प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी केले आहे.
खारेपाटण येथे २२ रोजी भाजीपाला उत्पादन व परसबाग प्रशिक्षण
