*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद उत्साहात साजरी केली. यानिमित्ताने नांदगाव तिठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती .अबाल वृध्दांपासून ते छोट्यापर्यंत यात उत्साहाने सहभागी झाले होते. नांदगांव गौसिया मजिद येथून रॅली काढून संपूर्ण मुस्लिम मोहला नांदगांव तिठा येथे येऊन तकरीर करण्यात आली. यावेळी नारे तकबीर अलाहो अकबर नारे रिसालत या रसूलूलाह ईद ए मिलादुन्नबी जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या . यावेळी कणकवली तहसीलदार आर.जे . पवार, कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर आदी या इद निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तहसीलदार रमेश पवार, पोलीस निरिक्षक सचिन हेदुंलकर , पोलीस उपनिरीक्षक शिंदे , वैद्यकीय अधिकारी डॉ. तपसे डॉ .कांबळी, डॉ. सोनी डॉ. वाळके, ठाणेकर पवार सिस्टर डाॅ. नाईक सरपंच अफ्रोजा नावलेकर , उपसरपंच निरज मोरये , पोलीस नाईक पारसेकर ,पोलीस नाईक वैभव कोळी, पोलीस उबाळे ,रज्जाक बटवाले आदी उपस्थित होते. यावेळी या सर्व मान्यवराचा शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणयात आला ईद ए मिलादुन्नबी जलसा कार्यक्रमच्या वेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यानी आपले मनोगत व्यक्त केले .10 वी 12 विद्यार्थाचा सत्कार मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.
नांदगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरी
