न्हावेली प्राथमिक शाळा नंबर १ ला दिली माडवी भेट
सावंतवाडी ता.-:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ ला शाळेचे माजी विद्यार्थी स्वप्नील लक्ष्मण मुळीक यांनी आपले वडील लक्ष्मण शिवा मुळीक यांच्या हस्ते श्री देवी सरस्वती साठी स्टील फ्रेम माटवी भेट स्वरूप प्रदान केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता नाईक यांनी देवी सरस्वतीच्या माटवीसाठी माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कामानिमित्त परदेशात असलेल्या शाळेचा माजी विद्यार्थी स्वप्नील लक्ष्मण मुळीक यांनी माडवी दिली आहे. यावेळी त्यांनी स्वतः फ्रेममेकर सोबत संपर्क साधून अगदी अल्पावधीत फ्रेम शाळेकडे सुपूर्द केली. शाळेची आणि आपली नाळ कायम जपत सहकार्य केल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ. स्मिता नाईक यांनी तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
