नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
*⚡सावंतवाडी ता.१४-:* सावंतवाडी शहरात आज मोती तलावाकाठी नव्याने बसवण्यात येणाऱ्या लोटस लॅम्पचे उद्घाटन नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, शहरअध्यक्ष अजय गोंदावळे, भाजप युवा नेते विशाल परब, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते.
