लोटस लॅम्पच्या शुभारंभ प्रसंगी दिला इशारा; नगराध्यक्ष संजू परब
*⚡सावंतवाडी ता.१४-:* सावंतवाडी शहरात आज मोती तलावाकाठी लावण्यात येणाऱ्या लोटस लॅम्प शुभारंभ करण्यात आला. यावेळी येत्या नगरपालिका निवडणुकीत शहरात मिशन लोटस करणार असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.
यावेळी ते म्हणाले की, शहरातील १७ च्या १७ जागांवर भाजपचेच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, शहरअध्यक्ष अजय गोंदावळे, भाजप युवा नेते विशाल परब, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते.
