चार महिन्याचे मानधन न मिळाल्याने घेतला निर्णय;रणजित देसाई यांची माहिती
*⚡कुडाळ ता.१४-:* चार महिन्यांचे मानधन न दिल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात आलेल्या १७ पैकी १६ डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात आली नसताना देखील जीवाची पर्वा न करता सेवा करणाऱ्या डॉक्टरांनी चार चार महिने मानधन मिळत नसेल तर त्यांनी का सेवा द्यावी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. …
