गुरे पोहोचली थेट प्रांताधिकारी कार्यालयात

कळणे ग्राम्सथांचे अनोखे आंदोलन कळणे खान बंधारा फुटी प्रकरणी मदत न मिळाल्याने ग्रामस्थ आक्रमक

*⚡सावंतवाडी ता.१३-:* कळणे खनिज प्रकल्प दुर्घटना होऊन तीन महिन्याच्या वर कालावधी उलटला असूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. ५० टक्के भरपाई देतो असे सांगून केवळ तुटपुंजी रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. या विरोधात आज कळणे येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या गुरांना घेऊन प्रांताधिकारी कार्यालय समोर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी प्रशासना विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. या आंदोलनाला मनसे आणि सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेकडून सक्रिय पाठिंबा दिला आहे. यावेळी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रेमानंद देसाई, मनसेचे संतोष भैरवकर, आशिष सुभेदार, दयानंद मेस्त्री, सुधीर राऊळ, वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे, कुंब्रल सरपंच प्रविण परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page