एडगाव सोसायटीची निवडणुक बिनविरोध

भाजपच्या ताब्यात सोसायटी

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील एडगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या या गावात सोसायटीही भाजपच्या ताब्यात राहीली आहे. सोसायटीतील १३ पैकी १३ जागा बिनविरोध झाल्या असून निवड झालेले सर्व संचालक भाजपचे आहेत. नवनिर्वाचित संचालकाचे आ.नितेश राणे व भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी अभिनंदन केले. सोसायटी निवडणुकींच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील एडगाव-वायंबोशी मधील श्री रवळनाथ विकास सेवा सोसायटीची निवडणूक जाहीर झाली होती.मात्र ही निवडणूक गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत बिनविरोध केली. प्रत्येक वाडीला प्रतिनिधित्व देत बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखली आहे. या सोसायटीच्या १३ पैकी १३ जागा बिनविरोध जिंकून भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे शतप्रतिशत यश संपादन केले आहे. या सोसायटीच्या संचालक पदी प्रमोद पुंडलिक रावराणे, जयेंद्र दत्ताराम रावराणे, सुनील श्रीपद रावराणे, अभिजित दशरथ पवार, शंकर भाऊ रावराणे, अशोक श्रीधर रावराणे, सचिन दौलत रावराणे,श्रीधर काशीराम घाडी,रेश्मा राजेंद्र सुतार, सरिता दशरथ गवळी,सदानंद राजाराम गुरव,गंगाराम भैरू अडुळकर,गंगाराम सखाराम वनकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

You cannot copy content of this page