*दोडामार्ग / सुमित दळवी* कळणे खनिज प्रकल्पाची दुर्घटना २९ जुलै रोजी घडली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी १३ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेले आंदोलन हे तीव्र स्वरुपाचे होणार असल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकरी अभय देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ते पुढे म्हणाले, कळणे येथील नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबासह प्रांत कार्यालय सावंतवाडी येथे धडक देणार आहेत. कारण पंचनाम्यानुसार मंजूर रकमेची ५० टक्के रक्कम दोन दिवसात अदा करून उर्वरित रकम देण्याचे पत्र देणार होते. परंतु ५० टक्के रक्कम न देता तुटपुंजी रक्कम खात्यात जमा करून गरीब शेतकरी वर्गाची खिल्ली उडविली गेली आहे, असा आरोप नुकसानग्रस्तांनी केला आहे.
कळणे नुकसानग्रस्त शेतकरी १३ ऑक्टोंबरला करणार तीव्र आंदोलन
