*दोडामार्ग / सुमित दळवी* नविन इमारतीचे काम पूर्ण करण्यास ठेकेदार दिरंगाई करत असल्याने पालकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी तसेच पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी यांनी सदर कामाची माहिती घेऊन तात्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. काल काम पूर्ण करून इमारत साफसफाई करण्यासाठी पालक प्रवीण गवस, संजय च्यारी ,वामन गवस, भरत गवस, सुप्रिया गवस ,नीकीता खरवत , भावना गवस, अनामिका गवस विनीता गवस, सुहानी नाईक ,लता वरक, सिद्दी केसरकर , सुहासीनी नांगरे,चंद्रकला गवस, कीर्ती गवस सुवर्णा गवस तसेच अन्य पालकांनी विशेष मेहनत घेतली. आज शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी, सरपंच सोनाली गवस, ग्रामपंचायत सदस्य मायकल लोबो, आणि ग्रामस्थ, पालक याच्या उपस्थित नविन इमारतीत शाळा सुरू करण्यात आली.
अखेर नवीन इमारतीत शाळा सुरू…
